दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रडोंबिवलीत बनावट बांधकाम पूर्णत्व दाखल्याच्या आधारे राजकल्प सोसायटीचे दस्त नोंदणीकरण

डोंबिवलीत बनावट बांधकाम पूर्णत्व दाखल्याच्या आधारे राजकल्प सोसायटीचे दस्त नोंदणीकरण

ठाणे ; विशेष प्रतिनिधी

कल्याण डोंबिवली पालिकेने बांधकाम परवानगी रद्द केलेल्या डोंबिवली पूर्वेतील मौजे आयरे गाव येथील राजकल्प काॅम्पलेक्स सोसायटीची बनावट बांधकाम परवानगी तयार केली. अनधिकृत म्हणून घोषित केलेल्या या इमारतीच्या बनावट बांधकाम परवानगीच्या आधारे या इमारतीचे विकासक, सोसायटी सदस्य यांनी संगनमत करून या सोसायटीचे दस्त नोंदणीकरण करून सोसायटी नोंंदणीकृत केली. हे प्रकरण उघड होताच या इमारतीच्या जमिनीच्या वारसदार यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी या इमारतीचे विकासक आणि सोसायटी सद्स्य अशा एकूण १९ जणांवर शुक्रवारी गुन्हा दाखल केला.

गरीबाचावाडा येथे राहणाऱ्या रेश्मा जनार्दन भोईर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राजकल्प काॅम्पलेक्स इमारतीची उभारणी करणारे मे. अष्टविनायकचे डेव्हलपर्सचे भागीदार विकासक अशोक भानजी जोशी, तुषार अशोक जोशी, धर्मेश अशोक जोशी, नियामत रसुल खान, कमलेश भानजी भंगदे, प्रशांत विनयकुमार चिलेकर, अविनाश मारूती दौंडकर, गिरीश अन्नाराव माने यांच्यासह सोसायटी सदस्य अजय दिलीप राणे, मृणाल सावंत, राहुल जाधव, गणेश पराडकर, सुमन किणी, भोगले, वंदा सावंत, सचिन सुळे, आत्माराम सावंत, रूपेश दळवी आणि सुनिता म्हात्रे यांच्या विरूध्द भारतीय न्याय संहिता कलमाने शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!