दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रडोंबिवली कुंभारखाणपाडा बेकायदा बांधकामप्रकरणी नगरसेवकांविरूध्द निवडणूक आयोगाकडे तक्रार;

डोंबिवली कुंभारखाणपाडा बेकायदा बांधकामप्रकरणी नगरसेवकांविरूध्द निवडणूक आयोगाकडे तक्रार;

ठाणे ; विशेष प्रतिनिधी

डोंबिवली बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली पश्चिमेतील कल्याण डोंबिवली पालिकेच्या ह प्रभागात एका नगरसेवकाने कुंभारखाणपाडा येथे भूमाफियांच्या माध्यमातून बेकायदा चाळी उभारून नंतर त्या स्वताच्या नावावर करून घेतल्या. आपल्या नगरसेवक पदाच्या अधिकाराचा वापर करून संबंधित बेकायदा चाळींना पालिकेकडून मालमत्ता कर लावून घेऊन त्या बेकायदा चाळी स्वताच्या नावावर करून घेतल्या. या बेकायदा चाळींप्रकरणी कुंभारखाणपाडा येथील रहिवासी मयूर म्हात्रे यांनी या बेकायदा चाळींशी संबंधित नगरसेवक आणि नगरसेविकेचे पद रद्द करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

नगरसेवकाशी संबंधित कुंभारखाणपाडा भागातील बेकायदा इमारत प्रकरणी तक्रारदार मयूर म्हात्रे यांनी मागील दोन वर्षाच्या कालावधीत अनेक तक्रारी पालिका आयुक्त, शासनाकडे केल्या आहेत. या नगरसेवकाने आपल्या अंगरक्षकाच्या नावाने पालिकेच्या आरक्षित भूखंडावर कुंभारखाणपाडा भागात एक बेकायदा इमारत बांधली आहे. याशिवाय या नगरसेवकाचा इतर बेकायदा इमारतीत समावेश आहे. या बेकायदा इमारतींमधील सदनिकांचे पैसे या नगरसेवकाच्या बँक खात्यावर जमा झाल्याची कागदोपत्री माहिती तक्रारदार मयूर म्हात्रे यांच्याकडे आहे

कुंभारखाणपाड्यात पालिकेच्या राखीव भूखंडावर याच नगरसेवकाने आपल्या अंगरक्षकाच्या माध्यमातून एका बेकायदा इमारत उभारली आहे. या बेकायदा इमारतीचे व्यवहार या नगरसेवकाशी निगडित आहेत. या सर्व व्यवहाराच्या प्रती आपणाकडे उपलब्ध असून आपण ही माहिती निवडणूक आयोगाकडे दिली आहे. याप्रकरणी बेकायदा इमारत प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणाशी संबंधित अंगरक्षकाचा पोलीस शोध घेत आहेत.

डोंबिवली पश्चिमेतील बेकायदा बांधकामाशी संबंधित एकूण आठ नगरसेवक आहेत. या नगरसेवकांच्या विरूध्द उच्च न्यायालयात, राज्य निवडणूक आयोगाकडे याचिका आणि तक्रारी संबंधित तक्रारदारांनी केल्या आहेत. यामध्ये काही मातबर नगरसेवकांचा समावेश आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!