दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रपत्रकार अरविंद कोठारी यांची नॅशनल जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ (इं) महाराष्ट्र राज्य प्रभारी...

पत्रकार अरविंद कोठारी यांची नॅशनल जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ (इं) महाराष्ट्र राज्य प्रभारी पदी नियुक्ती

दिवा ; विशेष प्रतिनिधी

ठाणे येथील प्रसिद्ध आरटीआय कार्यकर्ते अरविंद कोठारी, दैनिक हिंदी/मराठी वृत्तपत्राचे पत्रकार आणि दिवा बिझनेस असोसिएशनचे सदस्य, यांना राष्ट्रीय पत्रकार संघटनेतील त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ही जबाबदारी देण्यात आली.

नॅशनल जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदीश सिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय प्रभारी भागवत द्विवेदी यांच्या संमतीने, संस्थेत एक वर्ष चांगले आणि कार्यक्षम काम केल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली.

संघटनेच्या अधिकाऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. खासदार ऋषिकेश त्रिपाठी, राहुल शर्मा, प्रदेश प्रभारी अध्यक्ष, राजस्थान बाबूलाल योगी, प्रदेशाध्यक्ष, राजस्थान डॉ. अशोक चौहान, अध्यक्ष, उत्तर प्रदेश विनोद सिंह, प्रदेश प्रवक्ते, उत्तर प्रदेश राहुल राजा, प्रदेशाध्यक्ष, उत्तराखंड प्रल्हाद बरेथ, प्रदेशाध्यक्ष, छत्तीसगड, खासदार नरेंद्र सिंह पांडे, प्रदेशाध्यक्ष खासदार नरेंद्र सिंह, प्रदेशाध्यक्ष डॉ. दिनेशजी पांडे, विभागीय अध्यक्ष, जबलपूर, यांच्यासह मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, पत्रकार नागेशजी पवार (चालू वार्ता) आर.सी, रावल, सामाजिक कार्यकर्ते अमोल केंद्रे, ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, माजी नगरसेवक सुरेश कांबळे,भाजपचे प्रवक्ते एकनाथ कांबळे, दिव्यातीला शिंदे गटाचे नगरसेवक शैलेशजी पाटील, नगरसेवक आदेशजी भगत, नगरसेवक सुहासजी देसाई, मनोजजी, काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते राहुलजी पिंगळे, यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८

जाहिरात

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!