
चिपळूण : शहरातील युवा उद्योजक प्रथमेश ऊर्फ भैय्यु कापडी यांची चिपळूण तालुका वैश्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
प्रथमेश कापडी हे वैश्य समाज युवक कुटुंबाचे प्रमुख व आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात. वैश्य समाज मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये, तसेच चिपळूण शहरातील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते नेहमीच सक्रिय सहभाग घेत असतात.
त्यांच्या या निवडीमुळे पतसंस्थेच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल आणि ते आपल्या कार्यातून उत्तम कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



