दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणेपरीक्षेपासून वंचित राहण्याचा धोका टळला; ठाण्यातील अनधिकृत शाळेतील ११ विद्यार्थ्यांना दिलासा

परीक्षेपासून वंचित राहण्याचा धोका टळला; ठाण्यातील अनधिकृत शाळेतील ११ विद्यार्थ्यांना दिलासा

ठाणे; विशेष प्रतिनिधी

ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या हस्तक्षेपामुळे मुंब्रा येथील अनधिकृत शाळेमुळे फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या ११ विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संबंधित न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल ही शाळा अनधिकृत असल्याचे उघड झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या एसएससी परीक्षेच्या अर्जांबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती.

मात्र, शिक्षण विभागाने तातडीने कारवाई करत या विद्यार्थ्यांचे अर्ज मान्यताप्राप्त शाळेमार्फत भरून घेण्याची व्यवस्था केली असून जून-जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षेस बसता येईल आणि नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा देऊ शकतील, अशी ग्वाही दिली आहे.

प्रशासनाने अनधिकृत शाळांविरोधात कारवाई करण्याचे संकेत देत पालकांनी प्रवेश घेताना शाळेची मान्यता तपासून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!