दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रदिव्यात अजराकतेचा कळस; पालिकेत निवडून आलेले खेळाडू दिव्याच्या विकासाचे मैदान गाजवणार ?

दिव्यात अजराकतेचा कळस; पालिकेत निवडून आलेले खेळाडू दिव्याच्या विकासाचे मैदान गाजवणार ?

दिवा ; सई पाटील

जिवंतपणी” सुविधा नाहीत “मेल्यानंतर” अंतिम संस्कार करण्यासाठी लागणारे साहित्य मोफत मिळेल का ? अनिल मौर्या यांचे पालिका प्रशासनाला निवेदन

दिवा शहरांमध्ये राहणारे नागरिक हे अत्यंत सामान्य कुटुंबातले असून .जवळपास ३५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला ठाणे महानगरपालिका अंतर्गत दिवा शहर येते. दिवा शहरासाठी स्वतंत्र प्रभाग समिती देखील आहे.परंतु येथील नागरिकांच्यासाठी शासकीय हॉस्पिटल, खेळाचे मैदान ,गार्डन ,ग्रंथालय, वाचनालय,पोलिस ठाणे , चांगल्या शाळा,नागरिकांच्या साठी मुबलक पाणी या तर सुविधा नाहीच हे जगजाहीर असताना मेल्यावर देखील दिव्यातील सामान्य जनतेला अंतिम संस्कार करण्यासाठी आजही ७५०० सात हजार पाचशे रुपये पदरचे मोजावे लागत आहेत, ठाणे महानगर पालिकेचे दुर्दैव म्हणावे लागेल. आता तरी पालिका प्रशासनाने तत्काळ दखल घेवून अंतिम संस्कार करण्यासाठी लागणारे साहित्य मोफत देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते कु.अनिल रामपाल मौर्या यांनी ठाणे महानगर पालिका आयुक्त साहेब तसेच दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

जाहिरात

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!