दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रदिवा प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृत आठवडी बाजार तात्काळ बंद करा: सामाजिक कार्यकर्ते...

दिवा प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृत आठवडी बाजार तात्काळ बंद करा: सामाजिक कार्यकर्ते अमोल केंद्रे

संबंधित निष्क्रिय अधिकारी/कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी

दिवा; निलेश घाग

दिवा प्रभाग समिती हद्दीत दिवा येथे विविध ठिकाणी अनधिकृत आठवडी बाजार नियमितपणे भरत आहेत. या बाजारांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, अतिक्रमण, घाण, कचऱ्याचे ढीग आणि बाजारात येणाऱ्या महिलांचे दागिने आणि पर्स चोरीला जात असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. स्थानिक रहिवाशांकडून वेळोवेळी तक्रारी करूनही परिस्थिती तशीच राहिली आहे. परिस्थितीची पूर्ण माहिती असूनही, दिवा प्रभाग समितीचे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अनधिकृत आठवडी बाजारांबाबत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही हे विशेषतः लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. ही बाब गंभीर आहे आणि प्रशासकीय निष्क्रियता आणि कर्तव्यातील निष्काळजीपणा दर्शवते. अलिकडेच, कुळगाव बदलापूर नगरपालिकेने अनधिकृत आठवडी बाजारांवर बंदी घालण्याचा आणि फेरीवाला धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला.

प्रमुख मागण्या ;

१) दिवा विभाग समितीमधील अनधिकृत आठवडी बाजार तात्काळ बंद करावेत. मानखुर्द, शिवाजी नगर आणि धारावी यासारख्या दिवा बाहेरून येणारे लोक या बाजारात येतात. यापैकी बरेच बांगलादेशी असू शकतात आणि याची चौकशी करणे आवश्यक आहे.

२) अधिकृत सर्वेक्षण करून पात्र फेरीवाल्यांना कायदेशीर परवाने देण्यात यावेत.

३) मुख्य रस्ते, स्टेशन परिसर आणि सार्वजनिक क्षेत्रे “नो-फेरीवाला झोन” घोषित करून अतिक्रमणमुक्त करावीत.

  • प्रामुख्याने एसीबीमार्फत चौकशी करावी.

४) प्रकरणाची माहिती असूनही कारवाई न करणाऱ्या संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची विभागीय चौकशी सुरू करावी.

वरील बाबींवर तात्काळ कारवाई करावी तसेच केलेल्या कारवाईची माहिती देण्यात याकरिता सामाजिक कार्यकर्ते अमोल केंद्रे, आरटीआय कार्यकर्ते अरविंद कोठारी आणि नागेश पवार यांच्या माध्यमातून सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!