दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeभारतनई दिल्लीभारताच्या सीमेजवळ युद्धाचा भडका!पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी

भारताच्या सीमेजवळ युद्धाचा भडका!पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी

नवी दिल्ली

हिंदी महासागरात श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर बुधवारी एका इराणी युद्धनौकेवर भीषण पाणबुडी हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात इराणची आयआरआयएस डेना ही युद्धनौका समुद्रतळाला गेली असून, त्यावरील किमान १०१ कर्मचारी बेपत्ता आहेत, तर ७८ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती श्रीलंकेच्या नौदलाने आणि संरक्षण मंत्रालयाने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, १८० कर्मचारी असलेल्या या इराणी फ्रिगेटवरून पहाटेच्या सुमारास आपत्कालीन मेसेज पाठवण्यात आला होता. ही नौका श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून साधारण २५ मैल दक्षिणेला असताना अचानक मोठा स्फोट होऊन बुडू लागली. संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट एका अज्ञात पाणबुडीने केलेल्या हल्ल्यामुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!