दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रकेडीएमसीत सत्ताधारी पक्षातील आमदार आणि नगरसेवकांना काढावा लागतोय मोर्चा…

केडीएमसीत सत्ताधारी पक्षातील आमदार आणि नगरसेवकांना काढावा लागतोय मोर्चा…

डोंबिवली : अमित सावंत

केडीएमसीत सत्ताधाऱ्यांचे प्रशासन ऐकत नसल्याचे दिसून येत आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील लोढा हेवन या कॉम्प्लेक्स मध्ये आठवडा बाजार लावला जातो. हा आठवडा बाजार बंद करण्यासाठी शिवसेना नगरसेवकांनी मागणी केली होती.मात्र गेल्या चार महिन्यांपासून या मागणीला प्रशासनाने केराची टोपली दाखवली जात आहे.अखेर बुधवारी सकाळी शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वात केडीएमसीच्या ई प्रभागावर मोर्चा काढण्यात आला होता, या मोर्च्यात शिवसेना नगरसेवक आणि कार्यकर्ते सामिल झाले होते.यावेळी पालिका अधिकारी यांना इशारा देण्यात आला की शेवटचे नम्रतेचे आंदोलन आहे.यापुढे तीव्र आंदोलन होणार आणि अधिकाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा देण्यात आला.विशेष म्हणजे सत्ताधारी आमदार आणि नगरसेवक यांनाच पालिका अधिकारी जोमानत नसल्याचे यावरून दिसून येते, त्यामुळे आंदोलन करावे लागत आहे, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

स्टेशन बाहेरील परिसरात पुन्हा एकदा फेरीवाले बसू लागेल…

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक बाहेरील भागातील ग प्रभाग हद्दीतील फेरीवाल्यांना हटविण्याची जोरदार मोहीम पालिकेकडून सुरू केली होती. मात्र ही करावाई दिखावा असल्याची पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.कारण स्टेशन बाहेरील परिसरात पुन्हा एकदा फेरीवाले बसू लागेल असून महापालिकेची गाडी येते मात्र कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे नवीन निवडून आलेले सत्ताधारी नगरसेवक आता याविषयावर आवाजच उठवताना दिसत नाही आहे. काही दिवसापूर्वी तर चक्क केडीएमसीच्या महापौरचं फेरीवाल्याकडून सामान विकत घेतं असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!