दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणेडोंबिवली TDR प्रकरण; मध्यस्थीविरोधात गुन्हा दाखल

डोंबिवली TDR प्रकरण; मध्यस्थीविरोधात गुन्हा दाखल

कल्याण ; अमित सावंत

डोंबिवली पश्चिमेतील देवी चौक परिसरातील राममंदिराजवळ उभारण्यात येत असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीसाठी विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत एका मध्यस्थाने विकासकाकडून लाखो रुपयांची रक्कम घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील टीडीआर व्यवहारांमध्ये मध्यस्थ म्हणून काम करणारे प्राजक्त भालचंद्र पोतदार यांनी संबंधित इमारतीसाठी टीडीआर मिळवून देण्याचे सांगितले होते. त्यानुसार विकासक राजेंद्र गव्हाणकर यांनी धनादेशाच्या माध्यमातून एकूण १२ लाख रुपयांची रक्कम दिली होती.

मात्र, ठरल्याप्रमाणे टीडीआर उपलब्ध करून न देता संबंधितांकडून वारंवार टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर घेतलेल्या रकमेपैकी केवळ २ लाख रुपये परत करण्यात आले, तर उर्वरित १० लाख रुपये परत करण्यासही विलंब करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी विकासक राजेंद्र गव्हाणकर यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संबंधितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!