दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रजिल्हा परिषद, ठाणे अधिकारी श्री. रणजित यादव यांच्या उपस्थितीत प्राथमिक शिक्षकांच्या विविध...

जिल्हा परिषद, ठाणे अधिकारी श्री. रणजित यादव यांच्या उपस्थितीत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित आणि महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर बैठक संपन्न

ठाणे ; निलेश पांडुरंग घाग

शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करत शिक्षक पदोन्नती प्रक्रिया, आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शिक्षकांना S-14 वेतनश्रेणी लागू करणे, पदवीधर विषय शिक्षकांच्या वेतनश्रेणीतील प्रलंबित प्रश्न तसेच शिक्षकांच्या सेवाविषयक विविध बाबींवर सखोल विचारविनिमय करण्यात आला. प्रशासनाने संबंधित विषयांवरील सद्यस्थिती स्पष्ट करत नियमबद्ध, पारदर्शक आणि वेळबद्ध कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली.

शिक्षक हिताला सर्वोच्च प्राधान्य देत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक पाठपुरावा आणि समन्वय कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सकारात्मक संवादातून विविध मुद्द्यांवर पुढील कार्यवाहीसाठी दिशा निश्चित करण्यात आली.

यावेळी शिक्षण अधिकारी श्री. आशिष झुंझारराव, श्री . संजय शिंदे, श्री. गणेश भोसले, श्री. प्रकाश सानप, श्री. अंकुश माळी, प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. नितीन तारमळे, राज्य समन्वयक श्री. किशोर दिनकर, कोकण विभागीय अध्यक्ष श्री. गणेश पोतदार तसेच शिक्षक संघटनेचे विविध पदाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!