दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणे जिल्ह्यात RTE प्रवेशासाठी दुप्पटीने अर्ज

ठाणे जिल्ह्यात RTE प्रवेशासाठी दुप्पटीने अर्ज

ठाणे: सुशांत पाटील

ठाणे जिल्ह्यातील ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेसाठी यावर्षी दुप्पट अर्ज नोंदवले गेले असून, ११,७५४ जागांसाठी तब्बल २५,०५३ अर्ज प्राप्त झाले आहेत.

महापालिका क्षेत्रांमध्ये ठाणे, कळवा दिवा कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर या भागांत जास्त अर्ज आल्याचे दिसून आले, तर ग्रामीण तालुक्यांत कल्याण, भिवंडी, मुरबाड, अंबरनाथ आणि शहापूर या भागांत अर्ज कमी नोंदले गेले आहेत.

सुरुवातीला प्रवेश प्रक्रियेतील अडचणींमुळे काही पालकांनी अर्ज न करण्याचा निर्णय घेतला असला तरी न्यायालयीन मार्गदर्शनानंतर आणि प्रक्रिया सुलभ झाल्याने शेवटच्या टप्प्यात अर्जांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र, ग्रामीण भागातील जागरूकता आणि माहितीच्या अभावामुळे अर्ज कमी होणे चिंतेची बाब असल्याचे शिक्षण विभागाने नमूद केले आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!