दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या नेतृत्वात ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गुन्हे...

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या नेतृत्वात ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गुन्हे शोधण्यात कल्याण परिमंडळाचा प्रथम क्रमांक

ठाणे ; निलेश घाग

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या नेतृत्वात ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गुन्हे शोधण्यात कल्याण परिमंडळाने प्रथम क्रमांक पटकावून, मागील वर्षभरात तब्बल ३,०५७ गुन्ह्यांचा शोध लावत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत!

कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुलजी झेंडे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून राबवलेल्या ‘फिल्मी स्टाईल’ मोहिमा आणि गुन्हे शाखेच्या विशेष पथकांनी गांजा तस्करांपासून ते संघटित टोळ्यांपर्यंत सर्वांना गजाआड केले आहे.

अमली पदार्थ विरोधी मोहीम असो किंवा ‘मकोका’ अंतर्गत केलेली कठोर कारवाई, कल्याण पोलिसांनी आपल्या कामातून “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीदवाक्याचा खरा अर्थ समाजाला दाखवून दिला आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!