दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रडोंबिवली रिजन्सी अनंतम विद्यार्थ्याचे अपहरण ; ४ महिन्यांनंतर ५ लाखाची खंडणीची मागणी

डोंबिवली रिजन्सी अनंतम विद्यार्थ्याचे अपहरण ; ४ महिन्यांनंतर ५ लाखाची खंडणीची मागणी

ठाणे ; निलेश घाग

डोंबिवलीतील रिजन्सी अनंतम परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षा देण्यासाठी घरातून बाहेर पडलेला विद्यार्थी चार महिन्यांपासून बेपत्ता असून अज्ञात व्यक्तीकडून आता ५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे.

कुटुंबीयांकडून शोध सुरू असतानाच गेल्या आठवड्यात संशयिताने संपर्क साधत प्रथम ५० हजार रुपये पाठवण्याची मागणी केली आणि विद्यार्थ्याचा फोटो पाठवून तात्काळ डिलीट केला. तसेच पोलिसांना माहिती दिल्यास जीवितहानीची धमकीही दिली.

घटनेनंतर कुटुंबीयांनी मानपाडा पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अपहरण व खंडणीच्या गुन्ह्यांत तपास सुरू केला आहे.

भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!