दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रमीरा रोड येथे वाहतूक पोलिसांकडूनच पैशांची मागणी; वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले...

मीरा रोड येथे वाहतूक पोलिसांकडूनच पैशांची मागणी; वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले याच्यावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल

ठाणे; सुशांत पाटील

एका महिला पोलीस कर्मचाऱ्याकडेच महिन्याचा हप्ता मागितल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले आणि त्यांच्या सहायक निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर : मिरा रोड येथे वाहतूक पोलिसांकडूनच मासिक हप्त्याची मागणी केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षकावर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिरा-भाईंदर शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून काशिमीरा वाहतूक शाखेची उभारणी करण्यात आली आहे.

शहरातील विविध भागांमध्ये शंभरहून अधिक वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात असून त्यामध्ये महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

हे कर्मचारी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करतात. यामुळे शासनाच्या महसुलातही भर पडते. मात्र, अनेक वेळा दंड टाळण्यासाठी काही वाहनचालकांकडून रोख रक्कम घेऊन सोडण्यात येत असल्याच्या तक्रारी अधूनमधून समोर येत असतात.

दरम्यान, मिरा रोड येथे एका महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याकडून दरमहा ठराविक रक्कम देण्याची मागणी काशिमीरा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले आणि त्यांच्या सहायक निरीक्षकाकडून करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. या संदर्भात पैशांची मागणी करतानाचे पुरावे जमा करून संबंधित महिलेने एसीबीकडे लेखी तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत सहायक पोलीस आयुक्त दयानंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. चौकशीदरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंगोले यांनी पैशांची मागणी केल्याचे प्राथमिक निष्पन्न झाले. त्यानंतर सावंत यांनी अहवाल तयार करून काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.

वाहतूक पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

सदर महिलेने वरिष्ठांकडे दिलेल्या तक्रारीत इतर काही पोलीस कर्मचारीदेखील वरिष्ठ निरीक्षकांना दरमहा ठराविक रक्कम देत असल्याचा उल्लेख केला आहे. ही पद्धत नव्याने सुरू झालेली नसून पूर्वीपासूनच सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, आपण ही रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे हा वाद निर्माण झाला, असेही संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे.

मिरा रोडः काशिमीरा वाहतूक विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना सोयीची ड्युटी देण्यासाठी आणि त्रास न देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक आणि एका सहायक पोलीस उपनिरीक्षकावर मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलातील ‘हप्तेखोरी’ आणि ‘सिंडिकेट’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या काशिमीरा वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस हवालदाराने याप्रकरणी तक्रार दिली होती. तक्रारदार महिला कर्मचाऱ्याला ‘लाईट ड्युटी’ (सोयीचे काम) देण्यासाठी काशिमीरा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांनी दरमहा १५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

या मागणीचा पाठपुरावा ड्युटी अंमलदार सहायक पोलीस उपनिरीक्षक गोलार यांच्यामार्फत करण्यात येत होता. दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी गोलार यांनी तक्रारदाराकडे साहेबांसाठी १५,००० रुपये आणि स्वतःसाठी व एका सहकर्मी यांच्यासाठी प्रत्येकी २,५०० रुपये अशी एकूण २०,००० रुपयांची मागणी केली. वारंवार होणाऱ्या य पैशांच्या मागणीला कंटाळून महिला कर्मचाऱ्याने ५ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई एसीबीकडे धाव घेतली.

अखेर गुन्हा दाखल

तपासाअंती असे निष्पन्न झाले की, पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांच्या सांगण्यावरूनच गोलार हे लाचेची मागणी करत होते. याप्रकरणी एसीबीचे सहायक पोलीस आयुक्त दयानंद विठ्ठल सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३० मार्च २०२६ रोजी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस विभागातच सुरू असलेल्या या भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य नागरिकांसह पोलीस दलातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!