दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्ररबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा

रबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने कारवाई करत दोन जेसीबी मशिन जप्त केल्या असून रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई: प्रतिनिधी

रबाळे एमआयडीसी परिसरातील सर्व्हे नं. ९७, यादवनगर–इलवणपाडा भागात राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन व रस्ता काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने कारवाई करत दोन जेसीबी मशिन जप्त केल्या असून रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात नगरसेवक ममीत चौगुले यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!