दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणेठाणे महानगर पालिका महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी घेतला महासभा सभागृहाचा आढावा

ठाणे महानगर पालिका महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी घेतला महासभा सभागृहाचा आढावा

ठाणे : प्रतिनिधी

ठाणे महानगरपालिका ची सर्वसाधारण सभा येत्या 20 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित केली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी आज महासभेच्या सभागृहाची प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

यावेळी महापालिका सचिव मनिष जोशी, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड तसेच कार्यकारी अभियंता महेश बोराडे उपस्थित होते. महापौरांनी सभागृहातील आसनव्यवस्था, ध्वनीप्रणाली, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था आणि इतर मूलभूत सोयीसुविधांची तपासणी केली.

ठाणे महानगरपालिकेत सर्वपक्षीय 131 नगरसेवक निवडून आले असून, याशिवाय 10 स्वीकृत सदस्य सभागृहात येणार आहे. या पार्श्वभूमीवर एकूण सदस्य संख्या लक्षात घेता सभागृहातील आसनव्यवस्थेची महापौरांनी आढावा घेतला. महापौरांनी नमूद केले.

सर्वसाधारण सभा ही लोकप्रतिनिधींसाठी महत्त्वाचे व्यासपीठ असून कामकाज निर्विघ्न आणि शिस्तबद्ध पार पडणे आवश्यक आहे. त्यामुळे तांत्रिक बाबी, ध्वनिव्यवस्था आणि प्रशासकीय तयारीत कोणतीही त्रुटी राहू नये, याची दक्षता घ्यावी. तसेच महासभेच्या कामकाजाचा प्रारंभ बदललेल्या सुचनांनुसार राष्ट्रीय गीत अर्थात वंदे मातरम् आणि राज्यगीताने, तर महासभेचा समारोप राष्ट्रगीताने होणार असून ही ध्वनीफ‍ितीवर लावण्यात यावीत असेही महापौरांनी नमूद केले. एकूणच सर्वसाधारण सभा सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडावी, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सांगितले.

जाहिरात

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!