दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणेठाणे मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानक प्रकल्पाला चालना ;

ठाणे मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानक प्रकल्पाला चालना ;

ठाणे ; प्रतिनिधी

ठाणे रेल्वे स्थानकावरील दिवसेंदिवस वाढणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक उभारण्याच्या प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत याबाबतची माहिती दिली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी हे पत्र समाजमाध्यमावर प्रसारित केले.

ठाणे स्थानकावरील प्रवासी ताण लक्षात घेता मनोरुग्णालय परिसरात नवीन स्थानक उभारण्याची योजना अनेक वर्षांपासून चर्चेत होती. मात्र खर्च वाटप आणि तांत्रिक कारणांमुळे हा प्रकल्प रखडला होता. राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर आता या प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून नव्या स्थानकामुळे ठाणे, घोडबंदर रोड, पोखरण रोड, वागळे इस्टेट तसेच आसपासच्या परिसरातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!