दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणेगोवा बनावटीच्या दारुसहअडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

गोवा बनावटीच्या दारुसहअडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

चिपळूण :- तालुक्यातील कळंबस्ते गावच्या हद्दीत कळंबस्ते धामणंद रस्त्यावर रेल्वे फाटकाजवळ एका वाहनात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचे मद्य असल्याची खबर मिळाल्याने उत्पादन शुल्क खात्याने कारवाई करत तब्बल २,५८,९६०/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह प्रविण गणपत तांबिटकर, राहणार तांबिटकरवाडी, वालोपे याला ताब्यात घेतले आहे.
या कारवाईमध्ये -१) गोलन एस् व्हिस्की (गोवा राज्य निर्मित) या नावाचे ७५० मिलीचे २२ बॉक्स २६४ बाटल्या किंमत रुपये १,६८,९६०, २) एक मारुती ८०० गाडी-एमएच-०४- एएक्स-७०५० किंमत रु. ९०,०००/- एकूण मुद्देमाल किंमत २,५८,९६०/-असा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई एस. एस. मालुसरे दुय्यम निरीक्षक, चिपळूण क्र. १ तसेच स्टाफ व्ही. एस. विचारे, मयूर पुरीबुवा यांनी केली.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!