दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeशिक्षणKDMC कडून सात बेकायदा शाळांची यादी जाहीर,

KDMC कडून सात बेकायदा शाळांची यादी जाहीर,

ठाणे ;निलेश घाग

KDMC क्षेत्रात शासनाच्या अंतिम मान्यतेशिवाय सुरू असलेल्या सात अनधिकृत इंग्रजी प्राथमिक शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या शाळांना शासनाचा युनिक कोड (UDISE क्रमांक) प्राप्त नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा परिसरातील संबंधित शाळांविरोधात कारवाईचा इशारा देण्यात आला असून, दंड न भरता शाळा सुरू ठेवल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
पालकांनी नवीन शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी अधिकृत मान्यतेची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कल्याण पश्चिम येथील सहजानंद चौक, झोजवाला शॉपींग सेंटरमधील शिक्षण विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.
सदर शाळांमधील विद्यार्थ्यांचे इतर मान्यताप्राप्त शाळांत समायोजन करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!