दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रसिंधुदुर्गट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; तिकीट दरांमध्ये दुप्पट-तिप्पट वाढ : नियंत्रण नसल्याची तक्रार

ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; तिकीट दरांमध्ये दुप्पट-तिप्पट वाढ : नियंत्रण नसल्याची तक्रार

मुंबई :- उन्हाळी सुट्ट्यांमुळे एसटीने हंगामी भाडेवाढ केली असतानाच खासगी ट्रॅव्हल्सकडून तिकिटांचे दर दुप्पट-तिप्पट वाढवून प्रवाशांची लूट करण्यात येत आहे. विशेषत: कोल्हापूर, कोकण, सोलापूर आणि नाशिक या मार्गांवर तिकिटांचे दर भरमसाट वाढविण्यात आले असून, त्यावर परिवहन विभागाचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे प्रवाशांना वाढीव भाडे मोजावे लागत असून त्यांच्यात मोठी नाराजी आहे.
महामुंबई क्षेत्रातून दररोज शेकडो खासगी बस सुटतात आणि सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची मागणी वाढल्याने बसची संख्या वाढविली जाते, त्याचवेळी तिकीट दरही वाढविले जातात.
सध्या एसी स्लीपरसाठी २,००० ते २,५०० रुपये, तर सीटिंगसाठी १,५०० ते १,८०० रुपये आकारले जात आहेत. हेच तिकीट एरवी ६०० ते ८०० रुपयांत उपलब्ध असते.
गणपती, दसरा, दिवाळी, होळीचा सण तसेच उन्हाळी सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र एसटी आणि रेल्वेची तिकिटे ऐनवेळी मिळत नसल्याने प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सकडे वळतात. याच संधीचा फायदा घेत दरवाढ केली जात असल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे.

तिकीट दर (अंदाजे रुपयांत)

मार्ग इतर वेळेस उन्हाळी हंगामात

परळ-कोल्हापूर ६०० १,५०० ते २,५००

मुंबई-मालवण ६०० १,२०० ते २,०००

मुंबई-सोलापूर ५५० १,२०० ते २,५००

मुंबई-नाशिक ५०० ८०० ते १,०००

मुंबई- रत्नागिरी ५०० ते ६०० १,२०० ते २,०००

वाहतूकदारांच्या मते, मुंबई-कोल्हापूर एका फेरीसाठी २२ ते २३ हजार रुपयांचा खर्च येतो. एसी बससाठी आणखी २ ते ३ हजारांची भर पडते. डिझेल, टोल, देखभाल खर्च यामुळे खर्च वाढतो. सुट्ट्यांच्या काळात बस फुल्ल भरल्या जातात, मात्र परतीच्या प्रवासात अनेकदा बस रिकाम्या जातात. त्यामुळे दोन्ही बाजूंचा खर्च एका फेरीत वसूल करण्यासाठी दर वाढवावे लागतात.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!