दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeभारतनई दिल्लीदिवा रेल्वे उड्डाणपुलाचे ग्रहण सुटणार कधी; फाटकामुळे लांब पल्यांच्या गाड्यांचा खोळंबा!!

दिवा रेल्वे उड्डाणपुलाचे ग्रहण सुटणार कधी; फाटकामुळे लांब पल्यांच्या गाड्यांचा खोळंबा!!

दिवा ; विशेष प्रतिनिधी

मुंबई उपनगरी रेल्वेसह मेल-एक्स्प्रेस आणि मालवाहतूक रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकाला अडथळा ठरणाऱ्या दिवा रेल्वे फाटकावरून आता रेल्वे मंडळाने हस्तक्षेप सुरू केला आहे. तब्बल १३ वर्षांपासून रखडलेला दिवा रेल्वे उड्डाणपूल अद्याप अपूर्ण आहे. परिणामी रेल्वे फाटक सुरूच आहे. याची तातडीने दखल घेण्याच्या सूचना रेल्वे मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

रेल्वे पुलाला मजुरी कधी मिळाली जाणून घेऊया

२०१२;२०१३ मध्ये पुलाला मंजुरी मिळाली दिवा रेल्वे स्थानकातील रेल्वे फाटक बंद करून त्याजागी पूल उभारण्याच्या प्रस्तावाला सन २०१२-१३ मध्ये मंजुरी देण्यात आली. उड्डाणपुलाचे रेल्वे रुळांवरील भागाचे काम पूर्ण झाले असून त्याला जोडणाऱ्या मार्गांचे कामरित्या अपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दिवा लोकल साठी सामाजिक कार्यकर्ते अमोल केंद्रे आणिअश्विनी अमोल केंद्रे या दांपत्याने अनेक आंदोलने केली मात्र प्रशासनाकडून कुठलीही दखल न घेता रेल्वे प्रवाश्यांना नाहक प्रवासाचा सामना करावा लागत आहे

▪️कर्जत कसारा खोपोली मध्य रेल्वेच्या मार्गावर दिवा रेल्वे संवेदनशील फाटक

१ जुलै २०२५ रोजी राज्य सरकारने पत्रातून राज्यात सुरू असलेल्या ३९ रेल्वे उड्डाणपूल RUB आणि दहा रुळांखालील ये-जा करण्याचा मार्ग RUB प्रकल्पांबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे नमूद केले आहे.

दिवा फाटक सर्वाधिक गर्दीचा बिंदू असल्याने त्याकडे विशेष लक्ष वेधावे, असे पत्र तत्कालीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश यादव यांनी तत्कालीन मुख्य सचिव, राज्य सरकार, राजेश मीना यांना पाठवले आहे. दिवा रेल्वे जंक्शनमधून धीम्या आणि जलद अप-डाउन लोकल, अप-डाउन मेल-एक्स्प्रेस आणि मालगाड्या त्याचबरोबर दिवा मेमू गाड्यांची वाहतूक केली जाते. अनेकदा रेल्वे फाटक खुले झाल्यानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. ही वाहन कोंडी फुटेपर्यंत रेल्वेगाड्या खोळंबतात. रोज साधारण ३० ते ४० वेळा रेल्वे फाटकाची उघड-बंद होते.

भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८

जाहिरात

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!