दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रएस.टी.बस चालकास मारहाण,४ जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद

एस.टी.बस चालकास मारहाण,४ जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद

दापोली :- दापोली एस.टी. बस घेऊन जात असताना बसमधील प्रवाशांनी किरकोळ कारणावरून बस चालकाला शिवीगाळ करत मारहाण आणि धक्काबुक्की केल्याची घटना दापोली येथे घडली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात ४ संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बस चालक साई विवेक कदम (२७, रा. काळकाई कोंड, दापोली) हे दि. २२ एप्रिल रोजी पहाटे बोरिवली ते दापोली ही बस (एमएच ४९ बीई ८९४२) घेऊन येत होते. पहाटे साधारण ५ वाजण्याच्या सुमारास बस चिंचाळी फाटा येथे आली असताना राहुल ज्ञानेश्वर बिराजदार, गणेश
बालाजी बिराजदार, नवाल सोमनाथ कांबळे आणि शुभम बसवराज पाटील सर्व (रा. काटगाव जिल्हा धाराशिव) या प्रवाशांनी बसमधून उतरताना किरकोळ कारणास्तव चालक कदम यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की चालक कदम यांना या चौघांनी हाताच्या थापटाने मारहाण करीत धक्काबुक्की केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर चालक साई कदम यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साखरे करत आहेत.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!