दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रगुन्हेगारीपोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी सापळा; लाचखोर सुपरवायझर रंगेहात अटक

पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी सापळा; लाचखोर सुपरवायझर रंगेहात अटक

नवी मुंबई ; विशेष प्रतिनिधी

ड्युटी व बदलीसाठी महिन्याला ‘हप्ता’! लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

लाचलुचपत प्रतिबंध विभाग, नवी मुंबई घटकाने राबविलेल्या यशस्वी सापळा कारवाईत सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा पर्यवेक्षक निलेश तुकाराम बढे (वय ४६) यांना १,९०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आली.
तक्रारदार (वय ३६ वर्षे) हे सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा अंतर्गत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. आरोपी निलेश बढे हे एमएसईडीसीएल, कोपरखैरणे येथील पर्यवेक्षक (सुपरवायझर) असून, सुरक्षा रक्षकांची ड्युटी लावणे, पॉईंट तपासणी, हजेरी ठेवणे तसेच अहवालानुसार वेतन आणि बदल्यांबाबत शिफारस करण्याचे काम करीत होते.

तक्रारीनुसार, काम सुरळीत ठेवण्यासाठी आरोपीने तक्रारदाराकडे दरमहा १०० रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार व त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांची मिळून एकूण १,९०० रुपयांची रक्कम बाकी असल्याचे सांगण्यात आले होते. ही रक्कम न दिल्यास गैरसोयीच्या ठिकाणी बदली करणे किंवा कामावरून काढून मंडळाच्या प्रतीक्षा यादीत टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. ही रक्कम लाच असल्याने तक्रारदाराने ती देण्यास नकार देत कायदेशीर कारवाईसाठी लेखी तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईत आरोपीकडून १,९०० रुपयांच्या लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा कारवाई राबविण्यात आली. दिनांक २७/०२/२०२६ रोजी दुपारी १.०५ वाजता, एमएसईबी कॉलनी, सेक्टर १५ येथील सिक्युरिटी चौकीजवळ आरोपीने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले.

कारवाईदरम्यान आरोपीची अंगझडती घेण्यात आली असून, तपासणीसाठी त्यांचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपीच्या राहत्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी वाशी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीस तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे.

ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे, ला.प्र.वि. नवी मुंबई यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे तसेच पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी मार्गदर्शन केले.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!