दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रडोंबिवलीत पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला; पाच जणांना विरोधात गुन्हा दाखल

डोंबिवलीत पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला; पाच जणांना विरोधात गुन्हा दाखल

ठाणे ; निलेश घाग

डोंबिवली शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का देणारी गंभीर घटना उघडकीस आली असून रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले साहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोरा (वय ४९) यांच्यावर पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात बोरा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जुनी डोंबिवलीतील शिव मंदिर परिसरात गेल्या आठवड्यात ही घटना घडली. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपींनी पोलीस अधिकारी बोरा यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यावेळी एका मोटार कार चालकाने धारदार हत्याराने हल्ला केल्याने बोरा यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली.

या प्रकरणी बोरा यांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन बुलेट मोटारसायकलींवर आलेले चार जण आणि क्रेटा कार चालक अशा एकूण पाच जणांविरोधात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!