दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रदिवा गणेश नगर येथे महिलेला अश्लील शिवीगाळ तसेच मारहाण प्रकरणी ; पोलिस...

दिवा गणेश नगर येथे महिलेला अश्लील शिवीगाळ तसेच मारहाण प्रकरणी ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

१४ एप्रिल रोजी दिवा शहरात महिलेचा विनय भंग…

दिवा निलेश घाग

दिवा शहरातील गणेश नगर येथे १४ एप्रिल रोजी महिलेचा विनय भंग करून मारहाण व शिवीगाळ प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास दिवा पूर्व येथील गणेश नगर येथे मार्केट परिसरात ही घटना घडली असून. फिर्यादी महिला खरेदीसाठी गेली असताना आरोपींनी तिला भर रस्त्यात अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर तिच्यावर शारीरिक हल्ला करून केस ओढणे, डोक्यावर व पोटावर लाथा बुक्यांनी मारहाण करण्यात आली.


तसेच, “तक्रार दिल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील” अशी धमकीही आरोपींकडून देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदर दुर्दैवी घटनेतील महिला तसेच त्यांच्या घरच्यांनी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री अमोल धनराज केंद्रे यांची रात्री ११ वाजता भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला असता.त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस ठाण्यात जाऊन आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ७४, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करून घेतला.संबंधित आरोपींमध्ये मोतीराम दळवी व चैतन्या दळवी यांचा समावेश असून दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.
पोलीस निरीक्षक वसंत खतेले यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अन्य आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.यापुढे दिवा शहरात महिलांवर होणारे अत्याचार होऊ नयेत, प्रत्येकाने स्त्री चा मान सन्मान करावा जर दिवा शहरातील सामान्य जनतेला खास करून महिला भगिनींना कोणी त्रास दिला कायदेशीर धडा शिकवला जाईल.असे धडाकेबजा युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री अमोल धनराज केंद्रे यांनी सांगितले

भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८

.

जाहिरात

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!