
दिवा ; अभिजीत माने
ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळ्यात वाढलेली पाण्याची मागणी आणि काही भागांतील अपुरा व अनियमित पाणीपुरवठा लक्षात घेऊन नागरिकांच्या तातडीच्या गरजा भागवण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.
दिवा परिसरात नियमित व नियोजित टँकर सेवा सुरू ठेवण्यात येणार असून, पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी महापालिका प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८



