
रत्नागिरी; प्रतिनिधी
शहर पोलिसांची धडक पोलीसांची धडक कारवाई
रत्नागिरी –काल सकाळी पहाटे चे वेळेस कोल्हापुर येथुन एक इसम मोठया प्रमाणात प्रतिबंधीत गुटखा व पान मसाला विक्री करणाऱ्याचे उद्देशाने रत्नागिरी शहरात येणार असल्याची गोपनीय माहिती विश्वासु बातमीदारांकडुन पोलिसांना मिळाली होती.
ही कारवाई मा. पोलीस अधिक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधिक्षक महामुनी सर तसेच उपविभागिय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी दिलेल्या सुचना व केलेल्या मार्गदर्शनानुसार मा. पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी सागर शिंदे पोलीस उपनिरीक्षक, पोहेकॉ/८७७ राहुल जाधव, पोहेकॉ/१२२० रणजित जाधव, पोकॉ/५२५ शरद जाधव असे पथक तयार करुन कारवाई बाबत नियोजन केले.
सदरचे पथकाने पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांचे नियोजनबद्ध आखणीमुळे वरील पथकांने रत्नागिरी शहरात पहाटेचे वेळी धडक कारवाई करत आरोपी शरद गणपती भंडारे रा. सरुड ता. शाहुवाडी जि. कोल्हापुर यांस ३,२७,९०४/- रु प्रतिबंधीत गुटखा व पान मसाला या मुद्देमालासह वाहतुक करण्याकरीता वापर करण्यात आलेल्या रु ३,५०,०००/- किंमतीच्या इको वाहनासह असा एकुण ६,७७,९०४/- रु किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेले आहे.
तसेच रत्नागिरी शहर पोलीस ठाणे आरोपी शरद गणपती भंडारे विरुदध गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन पुढील तपास सागर शिंदे पोलीस उपनिरीक्षक रत्नागिरी शहर पोलीरा ठाणे हे करीत आहेत.


