दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणेबदलापूर पुन्हा हादरले; शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग

बदलापूर पुन्हा हादरले; शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग

ठाणे : प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी एका स्कूल व्हॅनमध्ये चिमुरडीवर झालेल्या अत्याचारानंतर, आता पुन्हा एका शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना बदलापुरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी बसचालकाविरोधात पोक्सो (POCSO) आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. शाळेतून घरी सोडत असताना बसमध्ये इतर विद्यार्थी कमी असताना किंवा ही विद्यार्थिनी एकटी असताना चालकाने तिची छेड काढली आणि विनयभंग केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शालेय परिवहन नियमांनुसार बसमध्ये महिला मदतनीस असणे अनिवार्य आहे, मात्र या बसमध्ये कोणतीही महिला कर्मचारी नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!