दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
HomeUncategorizedघरगुती गॅस जपून वापरा! आता २५ नाही तर इतक्या दिवसांनी मिळणार दुसरा...

घरगुती गॅस जपून वापरा! आता २५ नाही तर इतक्या दिवसांनी मिळणार दुसरा सिलेंडर

  पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली एलपीजीची टंचाई लक्षात घेता, गॅस कंपन्यांनी बुकिंगच्या नियमांत पुन्हा एकदा मोठे फेरबदल केले आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि इतर कंपन्यांनी आता ग्राहकांसाठी 'वेटिंग पिरियड' वाढवला असून, ठराविक कालावधी पूर्ण झाल्याशिवाय नवीन सिलिंडर बुक करता येणार नाही. गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि पुरवठा साखळी संतुलित ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
  नव्या नियमांनुसार, १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरसाठी दोन बुकिंगमधील अंतर आता २५ दिवसांवरून थेट ३५ दिवस करण्यात आले आहे. म्हणजेच, एकदा सिलिंडर मिळाल्यावर पुढच्या बुकिंगसाठी तुम्हाला किमान ३५ दिवस वाट पाहावी लागेल.

कोणासाठी काय आहे नियम ?

बँकांप्रमाणेच आता गॅस कंपन्यांनीही ग्राहकांच्या श्रेणीनुसार वेगवेगळे नियम लागू केले आहेत.
डबल सिलिंडर कनेक्शन : ज्या ग्राहकांकडे दोन सिलिंडरचे कनेक्शन आहे, त्यांना आता ३५ दिवसांनंतरच नवीन बुकिंग करता येईल.
सिंगल सिलिंडर कनेक्शन : ज्यांच्याकडे केवळ एकच सिलिंडर आहे, त्यांना थोडा दिलासा देत २५ दिवसांची मर्यादा ठेवण्यात आली आहे.
उज्ज्वला योजना लाभार्थी : या योजनेतील ग्राहकांसाठी नियम अधिक कडक असून, त्यांना पुढील बुकिंगसाठी ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागेल.
ग्रामीण भाग : ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी देखील ४५ दिवसांचा वेटिंग पिरियड अनिवार्य करण्यात आला आहे.

१२ सिलिंडरचा कोटा संपला तर ?

सरकार दरवर्षी १२ सिलिंडरवर सबसिडी देते. जर एखाद्या ग्राहकाने आपला वार्षिक कोटा पूर्ण केला असेल आणि त्याला अतिरिक्त सिलिंडर हवा असेल, तर आता प्रक्रिया अधिक कठीण झाली आहे.
ॲपवर प्रश्नावली : ग्राहकाला गॅस कंपनीच्या अधिकृत ॲपवर जाऊन काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.
तपशील अनिवार्य : कुटुंबातील सदस्यांची संख्या, घरी पाहुणे आले आहेत का, किंवा लग्नासारखा मोठा कार्यक्रम आहे का, याची माहिती द्यावी लागेल.
पडताळणी : या माहितीच्या आधारे कंपनी ठरवेल की ग्राहकाला अतिरिक्त सिलिंडर द्यायचा की नाही.
वाचा – LIC मधून निवृत्त, मग ‘सोनालिका’चे सम्राट! भारतातील सर्वात वयस्कर अब्जाधीशाचा थक्क करणारा प्रवास

डिलिव्हरीसाठी ‘OTP’ आणि ‘e-KYC’ सक्तीचे
केवळ बुकिंग करून चालणार नाही, तर सिलिंडर हातात मिळवण्यासाठी आता तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
डिलिव्हरी ओटीपी : सिलिंडर देताना डिलिव्हरी बॉयला तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी सांगणे अनिवार्य आहे.
e-KYC चे संकट : ज्या ग्राहकांनी अद्याप आपले ई-केवायसी पूर्ण केलेले नाही, त्यांचे बुकिंग रद्द केले जाऊ शकते. त्यामुळे त्वरित केवायसी अपडेट करणे हिताचे ठरेल.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!