दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeशिक्षणदहावीच्या निकालाची तारीख जाहीर

दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

मुंबई ; प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी – मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी (दि.८) दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. याबाबत राज्य मंडळाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आता निकालाची उत्सुकता निर्माण झालेली आहे.

आल्या होत्या. या परीक्षेसाठी राज्यातील एकुण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

एकुण ५ हजार १११ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळांवर उपलब्ध होतील. माहितीची प्रत प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे डिजीलॉकर अॉपमध्ये डिजीटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या शाळांचा एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी दिली आहे.

जाहिरात

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!