दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeभारतचिंताजनक ! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला...

चिंताजनक ! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट,

जिनिव्हा :- जीवघेण्या हंता व्हायरसबाबत जगभरातील १२ देशांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या देशांना पुढील धोक्याबाबत सूचना देत सावध केले आहे. एका क्रूझ जहाजामुळे या सर्व देशांवर नवे संकट ओढावले आहे. हंता व्हायरसची प्रकरणे गंभीर होण्यापूर्वीच काही प्रवासी जहाजातून उतरून आपापल्या देशात परतले, ज्यामुळे तेथे विषाणू पसरण्याचा धोका वाढला असल्याचं WHO ने सांगितले आहे.
वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी एका क्रूझवरील प्रादुर्भावाशी संबंधित हंता व्हायरसशी निगडित ५ प्रकरणांची पुष्टी केली. तर इतर तीन प्रकरणे अद्याप संशयास्पद आहेत. श्वासाशी संबंधित आजाराशी एकूण आठ प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यात तीन मृत्यूंचा समावेश आहे. यापैकी पाच प्रकरणे अँडीज व्हायरसशी संबंधित असल्याची पुष्टी झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आता त्या १२ देशांना अलर्ट केले आहे, ज्यांचे नागरिक प्रवासावेळी दक्षिण अटलांटिक महासागरातील सेंट हेलेना या दुर्गम ब्रिटिश प्रदेशात ‘एमव्ही होंडियस’ (MV Hondius) या क्रूझमधून खाली उतरले होते. या १२ देशांमध्ये कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, नेदरलँड्स, न्यूझीलंड, सेंट किट्स अँड नेव्हिस, सिंगापूर, स्वीडन, स्वित्झर्लंड, तुर्की, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांचा समावेश आहे.
WHO संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी जिनिव्हा येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले की, जर सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजना त्वरित आणि योग्यरित्या केल्या गेल्या तर सध्या या रोगाचा प्रसार ‘मर्यादित’ राहील अशी अपेक्षा आहे. अनेक देश प्रवासी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करत असल्याने आणखी प्रकरणे समोर येऊ शकतात असंही त्यांनी म्हटलं. अर्जेंटिनामधील प्रयोगशाळांमधून सुमारे २,५०० हंता व्हायरस चाचणी किट्स पाच देशांमध्ये पाठवले जात आहेत. तर या जहाजावर एकूण १४९ लोक असून ते २३ वेगवेगळ्या देशांचे नागरिक आहेत असं एमव्ही होंडियस जहाजाची डच ऑपरेटर कंपनी ओशनवाइड एक्सपेडिशन्सने माध्यमांना सांगितले.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!