
खा. डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्पाला गती
ठाणे ; प्रतिनिधी
मुंबईच्या मुक्त मार्गाच्या (फ्री वे) धर्तीवर उभारण्यात येत असलेला आणि नवी मुंबई ते डोंबिवली अंतर काही मिनिटांवर आणणाऱ्या ऐरोली काटई मुक्त मार्गाच्या उभारणीतील कोंडी लवकरच फुटणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील या मार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक जागेच्या उपलब्धतेसाठी भूसंपादन अधिकाऱ्यांनी नोटीस जाहीर केले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने साकारण्यात येत असलेल्या या प्रकल्पामुळे डोंबिवली ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात पार करता येणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मतदारसंघातील वाहतूक जलद व्हावी यासाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. मेट्रो १२, मेट्रो ५ आणि मेट्रो ५ चा उल्हासनगर,अंबरनाथ बदलापूर तसेच टिटवाळा पर्यंत विस्तार, विविध महत्वाचे उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल, सॅटिस यांसारखे अनेक मेगा प्रकल्प कल्याण लोकसभा मतदारसंघात राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ.शिंदे त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कल्याण डोंबिवली ते नवी मुंबई हे अंतर कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ऐरोली ते काटई फ्री वेची निर्मिती केली जाते आहे. या मार्गात ऐरोली भागातील खाडीपासून या मार्गाची सुरूवात होते. तर हा मार्ग डोंबिवलीजवळी काटई चौकात येऊन उतरणार आहे. हा मार्ग पूर्णपणे उन्नत असून हा मार्ग शिळफाटा येथील डोंगरातून ऐरोलीला जातो. यातील बोगदा तयार असून ऐरोली दिशेच्या बहुतांश भागाचे काम पूर्ण झाले आहे. तर मुंब्रा वाय जंक्शन पुलावरून या रस्त्याची मार्गिका जाते. बोगदा आणि बोगद्यातून येणारा मार्ग मुंब्रा वाय जंक्शन पुलावर येऊन थांबला आहे.
पुढच्या टप्प्यातील कामासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने या मार्गाचे काम रखडले होते. ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात येणाऱ्या या भागातील भूसंपादन करून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे अनेक प्रयत्नशील होते. अखेर या मार्गात आवश्यक जागेचे भूसंपादन करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून नोटीस जाहीर करण्यात आले आहे. यात आवश्यक जागेचा तपशील आणि गावांच्या नावांची माहिती देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला ही जागा खुली आहे, त्यामुळे कोणत्याही भूखंडधारकाचे यात विस्थापन होणार नाही.


