दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रदहावीत पुन्हा मुलींनी मारली बाजी; राज्याचा एकूण निकाल ९२.९ टक्के

दहावीत पुन्हा मुलींनी मारली बाजी; राज्याचा एकूण निकाल ९२.९ टक्के

महाराष्ट्र ; दबाव न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ दरम्यान घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाइन स्वरूपात जाहीर केला. राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या या निकालात यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.९ टक्के इतका नोंदवला गेला.

परीक्षेला बसलेल्या १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थ्यांपैकी १४ लाख २० हजार ४८७ विद्यार्थी उत्तीर्ण ठरले. यंदाही मुलींनी मुलांच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी करत निकालात आघाडी घेतली आहे

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!