दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रआरटीईची प्रतिक्षा यादी जाहीर होईना, पालक वर्ग चिंतेत

आरटीईची प्रतिक्षा यादी जाहीर होईना, पालक वर्ग चिंतेत

ठाणे ;निलेश पांडुरंग घाग

RTE अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत पहिल्या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कागदपत्र पडताळणीचे काम पूर्ण झाले असून शाळेत प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पहिल्या सोडतीमधील विद्यार्थ्यांना पडताळणीसाठी प्रशासनाकडून ८ मे पर्यंत मुदत दिली होती. मुदत संपून आठ दिवस उलटले तरी संकेतस्थळावर पुढील प्रक्रियेबाबत कोणतीही अद्ययावत माहिती तसेच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी कोणतीही सूचना जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रतिक्षेत असलेल्या पालकांना आपल्या पाल्याचा नंबर प्रतिक्षा यादीत लागेल की नाही याबाबत पेच निर्माण झाला आहे.

  • पहिल्या यादीत नाही तर, दुसऱ्या यादीत तरी आपल्या पाल्याची निवड होईल अशी भावना पालकांमध्ये आहे. त्यामुळे पालक आतुरतेने यादीची वाट पाहत आहेत.

शैक्षणिक वर्षे २०२६ -२७ या वर्षाची आरटीई कायद्याअंतर्गत होणाऱ्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरु आहेत. ठाणे जिल्ह्यातून आरटीईसाठी ६१५ शाळा पात्र झाल्या असून ११ हजार ७५४ जागांसाठी ही प्रक्रिया पार पडत आहे. या जागांसाठी ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातून २५ हजार २१ अर्ज प्राप्त झाले होते. यातून पहिल्या यादीत १० हजार ५७८ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली असून सध्या शाळेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.

यावर्षी पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीकरिता तीन वेळा मुदत वाढ देण्यात आली होती. कागदपत्र पडताळणीसाठी ८ मे अंतिम तारिख होती. ठाणे जिल्ह्यात निवड झालेल्या १० हजार ५७८ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ७ हजार ७०२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. परंतू, कागदपत्र पडताळणीची मुदत संपून आठ दिवस उलटून गेले तरी, संकेतस्थळावर प्रतिक्षा यादीबाबत तसेच पुढील प्रक्रियेबाबत कोणतिही अद्यावत माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही. ज्या विद्यार्थ्यांची पहिल्या यादीत निवड झालेली नाही अशा विद्यार्थ्यांचे पालक प्रतिक्षा यादीवर अवलंबून आहेत. प्रतिक्षा यादी कधी जाहीर होईल याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!