
रायगड :- मुंबई गोवा महामार्गावर सीएनजी पाठोपाठ पेट्रोल आणि डिझेलचाही तुटवडा निर्माण झाल्याचे ठिकठिकाणी पहायला मिळाले. महामार्गावरील अनेक पंप कोरडे झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे कोकणात पर्यटनासाठी आलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली .
सर्वच पंपावर इंधन संपले असल्याचे बोर्ड लागले होते. त्यामुळे अनेकांची चांगलीच अडचण झाली . अनेकांना डिझेलसाठी शोधाशोध करण्याची वेळ आली.
आखाती देशातील युध्दजन्य परिस्थिती पासून महामार्गावरील अनेक पंपावर कमी प्रमाणात इंधन पुरवठा होत असल्याचे सांगीतले जात आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी कोकणात दाखल होणाऱ्या पर्यटकांची संख्या अचानक वाढली आहे. त्यामुळे इंधनाची मागणीत वाढ झाली आहे. ज्या पंपावर इंधन उपलब्ध आहे तिथे वाहनांच्या रांगा मोठ्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे.मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे पेट्रोल पंप चालकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे कोकणात पर्यटनासाठी निघणार असाल तर आधी पुरेशा प्रमाणात इंधन भरूनच निघण्याचा सल्ला अडकून पडलेल्या प्रवाशांकडून दिला जात आहे.


