
कल्याण ; विशेष प्रतिनिधी
रिक्षात गांजा विक्रीसाठी आलेल्या उडीसा राज्यातील दोघांवर उल्हासनगर क्राईम ब्रँचने झडप टाकून त्यांच्याकडुन ८ लाखाच्या वर किमतीचा व २१ किलोच्या वर वजनाचा गांजा,रिक्षा,मोबाईल असा एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणात या दोघांना गांजा वाहतुकीसाठी मदत करणाऱ्या अंबरनाथ मधील रिक्षा चालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
१६ तारखेला क्राईम ब्रँचचे बाबुलाल जाधव हे टीमसोबत शहाड ब्रिजकडून अमरडॉय कंपनी जवळ सार्वजनिक रोडच्या ओसाड दिशेने पेट्रोलिंग करत असताना तिथे येणाऱ्या एका संशियत रिक्षाला अडवण्यात आले.रिक्षाची तपासणी व चौकशी केली असता,त्यात उडीसा राज्यातील बिकास बिकरम रणबैसा व सुधीर धरूबा रणबैसा यांच्याकडे असलेल्या बॅग मध्ये एकूण ८,६३,३६०/- रू.कि.चा २१.५८४ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशिररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळुन आला.

तसेच वरील दोन्ही इसमाचा साथीदार रिक्षाचालक हिदायतुल्ला बिसमिल्ला शेख याने गांजा वाहतूकीसाठी रिक्षाचा वापर केल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले.या तिन्ही इसमांकडून.एकुण ०९,३५,३६०/- रू. कि.चा. अंमली पदार्थ व इतर मुद्देमाल असा ऎवज पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे.या आरोपीतांना ताब्यात घेवून त्यांच्या विरूध्द उल्हासनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे)पंजाबराव उगले,पोलीस उपआयुक्त अमरसिंह जाधव,सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड,सहायक पोलीस निरीक्षक विजय काजारी,उपनिरीक्षक अशोक पवार,हवालदार प्रकाश पाटील,रितेश वंजारी,सतिश सपकाळे,चंद्रकांत सांवत,बाबुलाल जाधव,रामदास उगले,प्रसाद तोंडलीकर यांनी केली आहे.
भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८

जाहिरात



