
डोंबिवली, कल्याणमध्ये १० अनधिकृत शाळा प्रवेश न घेण्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे पालकांना आवाहन
दिवा शहरात अनधिकृत शाळांचे शतक पूर्ण? पालकवर्क चितेत?शालेय विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
ठाणे ; निलेश पांडुरंग घाग
कल्याण, डोंबिवली शहर परिसरात एकूण १० अनधिकृत शाळा आहेत. पालक, विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी या शाळांना ग्लोबल, इंटरनॅशनल अशी नावे देऊन या शाळा सीबीएससी, आयसीएससी, आयबी बोर्डाच्या अधिपत्याखाली आहेत असे दाखवून पालक, विद्यार्थ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न या शाळा चालकांनी केला आहे. त्यामुळे या अनधिकृत शाळांना शासनाची मान्यता नसल्याने या शाळांमध्ये पालकांनी आपल्या मुलांना प्रवेश घेऊ नये, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.
◼️अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास जबाबदारी पालकांचीच; शिक्षण विभागाचा फौजदारी कारवाईचा इशारा.
ठाणे जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागातील प्रत्येक शाळेत नव्याने प्रवेश घेताना पालक, विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा मान्यताप्राप्त आहे का याची खात्री करून घ्यावी. मगच आपल्या पाल्याला तेथे प्रवेश घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे पालकांना करण्यात आले आहे ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात शासनाची मान्यता न घेता काही संस्थांकडून अनधिकृतपणे खासगी शाळा सुरू केल्याची बाब निदर्शनास आली आहे. या शाळांकडून राज्य शिक्षण मंडळ, सीबीएससी, आयसीएससी, आयबी बोर्डांच्या नावाखाली आकर्षक जाहिराती केल्या जात आहेत. या माध्यमातून पालकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळा शासनमान्य आहे की नाही याची खात्री करूनच प्रवेश घ्यावा. जिल्हा परिषद ठाणेच्या कार्यक्षेत्रात एकही अनधिकृत शाळा सुरू राहू नये यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ अंतर्गत अशा शाळांविरुद्ध दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येत आहे, असे शिक्षणाधिकारी राक्षे यांनी सांगितले.

◼️अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश घेतल्यास व त्यातून शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित पालकांची राहील, याची नोंद घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
◼️कल्याण तालुका पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या दहा अनधिकृत शाळा पुढीलप्रमाणे आहेत.
जी. के. इंग्रजी हायस्कूल खडवली, ता. कल्याण, चैतन्य टेक्नास्कूल, रिजन्सी अनंतम, डोंबिवली (पू.), कमांडर प्रकाश इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज खडवली पूर्व, ता.कल्याण, कायधान इंग्लिश स्कूल ,ता.कल्याण, ए.पी. एच. स्कूल खोणी, काटई बदलापूर रस्ता, ता.कल्याण, सिम्बायोसिस स्कूल, कोंढेरी, ता.कल्याण, एस.आर.डी. पी.स्कूल, निबंवली, ता.कल्याण, संभाजीराव देशमुख पब्लिक स्कूल, निंबवली, ता.कल्याण,सेव्हन स्ट्रीम स्कूल पिसवली, ता.कल्याण,
ओमकार इंग्लिश स्कूल, पिसवली, कल्याण शिळफाटा रस्ता, ता.कल्याण
पालकांनी आपल्या पाल्याचा शाळेत प्रवेश घेताना संबंधित शाळा शासनमान्य आहे की नाही, याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. अनधिकृत शाळांकडून आकर्षक जाहिराती करून पालकांची फसवणूक केली जात आहे. अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. पालकांनी जागरूक राहून केवळ मान्यताप्राप्त शाळांमध्येच प्रवेश घ्यावा. जिल्हा परिषद ठाणेच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत शाळांविरुद्ध कठोर कारवाई सुरू आहे.- बाळासाहेब राक्षे शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग, जिल्हा परिषद, ठाणे

जाहिरात



