
ठाणे ; निलेश घाग
कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील ४१ ठिकाणी क्लस्टर योजना राबविण्याचे ठरविले आहे. मात्र, २७ गावातील नागरिक आणि सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती यांनी या योजनेचा तीव्र विरोध नोंदविला आहे.
समितीने प्रशासनाला इशारा दिला आहे की, गावकऱ्यांचा विरोध न जुमानता महापालिकेने सक्तीने योजना राबविल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. समितीच्या माध्यमातून २७ गावांमध्ये चर्चासत्रे आयोजित केली जात आहेत, जिथे जमीन मालक आणि शेतकरी विविध प्रश्नांवर चर्चा करीत आहेत.
या २७ गावांमध्ये माणगाव, सोनारपाडा, भोपर, सागाव, दावडी, गेळवली, आडीवली, पिसवली, चिंचपाडा इत्यादी गावांचा समावेश आहे. या गावांतील जमीन मालक विविध विकास प्रकल्पांमुळे आधीच प्रभावित झाले आहेत.
भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८

जाहिरात

जाहिरात



