दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रकल्याण शीळ मार्गावरील मेट्रोचे काम सुरक्षित आहे का; मुलुंड दुर्घटनेनंतर प्रवाशांची मागणी

कल्याण शीळ मार्गावरील मेट्रोचे काम सुरक्षित आहे का; मुलुंड दुर्घटनेनंतर प्रवाशांची मागणी

ठाणे ; निलेश घाग

मुलुंड येथे मेट्रो बांधकामादरम्यान झालेल्या भीषण अपघातानंतर कल्याण–शिळफाटा मार्गावरील मेट्रो कामांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त करत तातडीने सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी केली आहे.

या मार्गावर सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पातील पिलर व स्लॅब उभारणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असतानाच संभाव्य धोका असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

मुलुंड येथील दुर्घटनेत पिलरचा भाग कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला व काही जण जखमी झाल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

त्यामुळे कल्याण–शिळफाटा मार्गावरील सर्व बांधकाम स्थळांची तज्ज्ञांकडून सखोल तपासणी करून आवश्यक त्या सुरक्षाव्यवस्था काटेकोरपणे राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवासी व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!