
चिपळूण :- उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर
वाढलेल्या गर्दीला दिलासा देण्यासाठी चिपळूण – दिवादरम्यान विशेष मेमू अनारक्षित गाड्या धावणार आहेत. या विशेष गाड्या १ मे २०२६ ते ७ जून २०२६ या कालावधीत दर शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी धावणार आहेत.
गाडी क्रमांक ०११६० चिपळूण – दिवा मेमू विशेष दुपारी ३:३० वाजता चिपळूणहून सुटून त्याच दिवशी रात्री ११:१० वाजता दिवा येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५९ दिवा – चिपळूण मेमू विशेष रात्री ११:२५ वाजता दिवा येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता चिपळूण येथे पोहोचणार आहे.
ही गाडी अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे-वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा, सोमटणे, पनवेल, कळंबोली, तळोजा पांचनंद आणि निळजे या स्थानकांवर थांबा घेणार आहे.


