दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रगुन्हेगारीगुंगीचे औषध देऊन एका विवाहितेवर अत्याचार करणारा ; "जावेद अख्तर जमीलुद्दीन खान"...

गुंगीचे औषध देऊन एका विवाहितेवर अत्याचार करणारा ; “जावेद अख्तर जमीलुद्दीन खान” व इतर आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल..!

मुंब्रा; विशेष प्रतिनिधी

सासरच्या मंडळींकडून सातत्याने मानसिक व शारीरिक छळ, मुलगी झाल्यामुळे टोमणे, जबरदस्तीने गर्भपात करण्यासाठी दबाव, तसेच लग्नात मिळालेले सोन्याचे दागिने परत न देता अपहार केल्याप्रकरणी एका २८ वर्षीय विवाहितेने मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

तक्रारदार महिलेचा विवाह जून २०२३ मध्ये सलमान खान याच्याशी झाला होता. विवाहानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत असताना काही दिवसांनी पती, सासू, सासरे, नणंद व इतर नातेवाईकांकडून हुंड्यासाठी व कौटुंबिक कारणांवरून त्रास देण्यास सुरुवात झाल्याचा आरोप तिने केला आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, मुलगी झाल्यानंतर तिला वारंवार अपमानास्पद शब्दांत हिणविण्यात आले. तसेच गर्भधारणेदरम्यान गर्भपात करण्यासाठी दबाव आणण्यात आला. विरोध केल्यास मारहाण करण्यात आली आणि तिचा छळ वाढविण्यात आला, असा आरोप तिने तक्रारीत केला आहे.

याशिवाय, लग्नावेळी माहेरकडून देण्यात आलेले सुमारे दहा तोळे सोन्याचे दागिने सासरच्या मंडळींनी स्वतःकडे ठेवून त्यांचा अपहार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच पतीच्या बहिणीच्या पतीकडून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर संबंधितांकडून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचेही महिलेने नमूद केले आहे.

या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम ८५, ३५२, ३५१(३), ६४(२)(फ) तसेच कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सोनी सदाशिव शेटी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत

जाहिरात.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!