दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeशिक्षणआर.टी.ई प्रवेशासाठी १९ जूनपर्यंत मुदतवाढ

आर.टी.ई प्रवेशासाठी १९ जूनपर्यंत मुदतवाढ

ठाणे ; कल्याणी मोरे

विद्यार्थ्यांच्या पालकांना १३ जून ते १९ जून २०२६ या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

आरटीई (शिक्षणाचा हक्क) कायदा २००९ अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षाधीन यादीच्या दुसऱ्या टप्प्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना १३ जून ते १९ जून २०२६ या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. यापूर्वी प्रवेशाची मुदत १२ जूनपर्यंत होती.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये मोफत प्रवेश देणाऱ्या या योजनेअंतर्गत प्रतीक्षाधीन यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शाळांशी संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हा दुसरा व अंतिम टप्पा असल्याने कोणताही विलंब न करता प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!