दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रगुन्हेगारीठाण्यात पोलिस कर्मचाऱ्याची सायबर फसवणूक ;बँकेविरुद्ध तक्रार दाखल

ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्याची सायबर फसवणूक ;बँकेविरुद्ध तक्रार दाखल

ठाणे ; निलेश घाग

ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला हॅकर्सकडून सायबर फसवणुकीचा सामना करावा लागला आहे. आरोपींनी बँक खात्यातून लाखोंची रक्कम काढली आणि क्रेडिट कार्ड फसवणूकही केली. पोलीस कर्मचाऱ्याने त्वरित संबंधित बँकेविरुद्ध आणि संशयित हॅकर्सविरोधात तक्रार दाखल केली आहे.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, १० फेब्रुवारी रोजी पोलीस कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर दोन संदेश आले, ज्यात एका संदेशात त्याच्या खात्यातून ५० हजार रुपये तर दुसऱ्या संदेशात २८ हजार रुपये कापल्याची माहिती होती. चौकशी केल्यानंतर कळाले की त्याचे ई-मेल आणि मोबाइल हॅक झाले होते.

सायबर फसवणूक कोणाचीही होऊ शकते, त्यामुळे पोलिसांनी डिजिटल व्यवहारांबाबत सतर्क राहण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!