दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणेकरांनो लक्ष द्या! ३ जूनला १२ तास पाणीपुरवठा बंद

ठाणेकरांनो लक्ष द्या! ३ जूनला १२ तास पाणीपुरवठा बंद

ठाणे ; निलेश पांडुरंग घाग

ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. महापालिकेच्या टेमघर जलशुद्धीकरण केंद्र आणि पिसे उदंचन केंद्र येथील उच्चदाब उपकेंद्रामध्ये पावसाळ्यापूर्वीची तांत्रिक देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे बुधवार, ३ जून रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत तब्बल १२ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

या कालावधीत घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल परिसर, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटरनिटी जंक्शन तसेच कळवा-मुंब्रा परिसरातील पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतरही काही भागांमध्ये पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८

जाहिरात

जाहीरत

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!