
ठाणे ; निलेश पांडुरंग घाग
दिवा शहरातील शाळांतील जनगणना अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या गैरहजर शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा मुंब्रा पोलीस ठाण्यात अदखलपात्र अहवाल भा. न्या. सं. २०२३ चे कलम २२२ प्रमाणे तक्रारदार दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त श्री शिवप्रसाद नागरगोजे, सहाय्यक आयुक्त तथा चार्ज जनगणना अधिकारी दिवा प्रभाग समिती ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या वतीने ड्यु ड्रॉप इंग्लिश स्कूल दिवा येथील शिक्षक नामे श्रीमती अनुष्का नाईक, दीपिका पगारे, दिव्या हळदणकर, जयप्रकाश बेन बन्सी, कल्पना महाले, माधुरी गुरव व इतर तसेच ग्लोबल इंग्लिश स्कूल दिवा शिक्षक अनिकेत जनगणना २०२७ संजय जाधव, दीक्षा कन्हैया सिंग, संध्या रवी अहिरे, अनिकेत ओम प्रकाश गुप्ता, यश विश्वास भोसटेकर व इतर आणि साउथ इंडियन स्कूल दिवा शिक्षक अरुण कुमार यादव व इतर यांनी २३ / ०४/२०२६ रोजी पासुन ते अद्याप पावेतो प्रकार यातील तक्रारदार व विरोधक हे शासकिय कर्मचारी असुन, विरोधक कर्तव्यावर अनुउपस्थित असल्याने त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्डा रावल करण्यात आला आहे. जनगणना २०२७ चे अनुशंगाने तक्रारदार यांची चार्ज जनगणना अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून यांना जनगणनेसाठी कर्तव्य नेमण्यात आलेले आहे. जनगणना २०२७ चे अनुशंगाने नेमलेल्या शिक्षकांना दिनांक २३.०४.२०२६ रोजी पासून प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आलेले आहे. विरोधक यांना जनगणना कर्तव्यासाठी हजर राहणे कायदेशीर दृष्ट्या बांधील असतानाही त्यांनी जनगणना कर्तव्यासाठी अनुपस्थित राहून सहाय्य नाकारले म्हणून त्यांचे विरोधात अदखलपात्र अहवाल भा.ना.सु. सं १७४ (२) (ii) नुसार संबंधित कोर्टाकडुन दाद मिळविण्याची समज देण्यात आली आहे.
भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८

जाहिरात

जाहिरात



