
पनवेल शहराला अतिक्रमणाचा विळखा.
पनवेल / केवल महाडिक
पनवेल महानगरपालिका हद्दीमधील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे एकीकडे आयुक्त मंगेश चितळे हे आपल्या एसी केबिनमध्ये बसून खुर्ची उगवत असताना अतिक्रमण विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना हफ्तेखोरीने ग्रासले आहे. प्रभागातील नगरसेवक तर अतिक्रमण जास्त कसे वाढेल याच प्रयत्नात आहेत. पनवेल शहर हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हुतात्मा स्मारक तथा हुतात्मा हिरवे गुरुजी चौक या ठिकाणी शूज दुकाने, कपड्यांचे दुकाने यांनी आपल्या दुकानांसमोर बाकडे भाड्याने देऊन अतिक्रमण थाटलेले असताना आता चौकामध्येच थेट रस्ताच काबीज करून चादर विक्रेत्यांनी आपला बेडशीटचा डोलारा रस्त्यावर मांडून अतिक्रमणाचा बाजार मांडला आहे. आर्थिक हफ्तेखोरीतून विशेषतः प्रभाग समिती ड अंतर्गत अतिक्रमण वाढीस लागले असून याकडे अतिक्रमण विभाग प्रभाग समिती अधिकारी व अधीक्षक, पर्यवेक्षक यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिक करीत आहेत. एकीकडे लोकांना चालायला जागा नाही आणि दुकानवाल्यानी थेट फुटपाथझालं रस्ते यावरच अतिक्रमण करायला सुरुवात केल्याने दाद कोणाकडे मागायची असा सवाल जनता विचारत आहे.


