दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणेठाणे रेल्वे स्टेशन परिसरात अमली पदार्थाच्या नशेचे प्रमाण

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात अमली पदार्थाच्या नशेचे प्रमाण

ठाणे; प्रतिनिधी

ठाणे मध्य रेल्वे स्थानक परिसरात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर येत आहे. गजबजलेल्या या परिसरात गांजाची नशा करणाऱ्यांचा वावर वाढल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी नुकतीच कारवाई करत २२ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गांजाचे पाकीट, चिलीम आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. या घटनेमुळे स्थानक परिसरात नशेखोरांचा त्रास वाढत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

प्रवाशांना होणारा त्रास आणि सुरक्षेचा वाढता प्रश्न लक्षात घेता, अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!