दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणेठाण्यात २१ मे रोजी पाणीपुरवठा बंद !! या भागात पाणी कपात

ठाण्यात २१ मे रोजी पाणीपुरवठा बंद !! या भागात पाणी कपात

ठाणे; निलेश पांडुरंग घाग

ठाणे शहरात बारवी जलवाहिनीवरील तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवार दुपारपासून २४ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. ठाणे, मुंब्रा, दिवा आणि कळवा परिसरातील अनेक भागांवर याचा परिणाम होणार असून, पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतरही पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे.

गुरुवार २१ मे रोजी दुपारी १२ वाजल्यापासून शुक्रवार २२ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असून, दिवा, कळवा, मुंब्रा, माजिवडा-मानपाडा आणि वागळे प्रभाग समितीतील काही भागांना याचा फटका बसणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन ठाणे महापालिकेने व्यक्त केले आहे.

भारत सरकार मान्यता प्राप्त RNI No.
MAHMAR2014/५९६९८

जाहिरात

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!