दुनिया में जो बदलाव आप देखना चाहते हैं, वह खुद बनिए. - महात्मा गांधी
Homeमहाराष्ट्रठाणेदिवा पूर्वेकडील तिकीट घर रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी

दिवा पूर्वेकडील तिकीट घर रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी

ठाणे ; निलेश घाग

दिवा रेल्वे स्थानकातून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. दिवा शहराची सुमारे ९० टक्क्यांहून अधिक लोकवस्ती ही पूर्व भागात असून, त्या तुलनेत दिवा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील प्रवाशांसाठी उपलब्ध तिकीट सुविधांमध्ये मोठी अपुरी व्यवस्था असल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस स्थानकाच्या पूर्वेकडील तिकीटघर रात्री ९ वाजताच बंद केले जात असल्याने उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांना पश्चिमेकडील तिकीटघराकडे जावे लागते किंवा ऑनलाईन तिकीट प्रणालीवर अवलंबून राहावे लागते. मात्र, सर्व प्रवाशांकडे स्मार्टफोन किंवा ऑनलाईन सुविधांची उपलब्धता नसल्याने त्यांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर दिवा रेल्वे प्रवाशी संघटनेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे मागणी करण्यात आली असून, पूर्वेकडील तिकीटघर रात्री किमान १२ वाजेपर्यंत सुरू ठेवावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता, प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

जाहिरात

संबंधित ख़बरें

लेटेस्ट

ख़ास ख़बरें

error: Content is protected !!